अल्पवयीन मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचाराचा आरोप; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल-Tamalwadi Police Station Crime News
तुळजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली कारवाई
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षे 9 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर मागील वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांनी एका तरुणासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेऊन मागील सुमारे एक वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक 2 असलेल्या महिलेने या कृत्यास मदत करून अत्याचारास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने 3 जून 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 65(1), 3(5) तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम 4, 6, 8 व 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments