Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा दिवाळीत महागाईमुळे फटाक्यांचा आवाज घुमेना ! परतीच्या पावसामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्र थंडावले , फटाक्यांच्या दरामध्ये २५ ते ३० टक्के दरवाढ

 यंदा दिवाळीत  महागाईमुळे फटाक्यांचा आवाज घुमेना ! परतीच्या पावसामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्र थंडावले , फटाक्यांच्या दरामध्ये २५ ते ३० टक्के दरवाढ 


 तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: एकीकडे दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपलेला असताना दुसरीकडे मात्र मागील आठ दिवसापासून परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केली आहे. खरे पाहता दिवाळीत पाऊस नसतोच असते ते बोचरी थंडी, पावसामुळे खरिपातील हाता तोंडाशी आलेली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे यंदा पावसामुळे शेतकऱ्याच्या दिवाळी सणावर विरजण पडले आहे, त्यातच गगनाला भिडलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. यावर्षी फटाक्यांचा दरामध्ये २५ ते ३० टक्क्यांनी दरवाढ झाल्याचे व्यावसायिकातून बोलले जात आहे. त्यामुळे उत्साहासाठी फटाके खरेदी करणाऱ्यांना महागाईच्या झळा सोसावे लागत आहेत. घरातील किराणा साहित्यसह फटाक्यांची दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. तर दुसरीकडे खरीपातील पिकांचे  नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात संपला आहे त्याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थचक्रावर होताना दिसत आहे. दरम्यान यावर्षी जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच सततचा पाऊस ,अतिवृष्टी यामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही परिणामी याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे उत्सवावर विरजण पडले होते. परंतु यंदा निर्बंध मुक्त दिवाळी साजरी होत आहे त्यामुळे यावर्षी उत्सवाचे वातावरण असल्याने ग्राहक फटाके खरेदी करतील अशी आशा ग्रामीण भागातील व्यावसायिक बाळगून बसलेले असताना मात्र परतीचे पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील आर्थिक चक्र थंडावल्याचे दिसून येत आहे.
------------------------------------------------------------------

बालाघाट न्युज टाइम्सच्या सर्व वाचकांना      दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !



Post a Comment

0 Comments