किलज प्रतिनिधी : तुळजापुर तालुक्यातील किलज येथील रहिवाशी व लातूर जिल्ह्यातील श्री प्रेमनाथ विद्यालय थेरगाव येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत असणारे श्री पवार वालचंद शाम यांची मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा " राज्यस्तरिय शिक्षकरत्न पुरस्कार 2022 करीता निवड करण्यात आलेली असून रविवार दि 20 नोव्हेंबर रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा आयोजित, श्री स्वामी हॉल सभागृह ,कोथरूड पुणे येथे होणार्या राज्यस्तरिय गुणिजन गौरव पुरस्कार वितरण समारंभाच्या शाही कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा तथा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.वालचंद पवार यांची राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव श्री बाबुराव पेठे संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायणराव पाटील कोषाध्यक्ष देवशेटवर सर संचालक नंदू पाटील शंकर पाटील मु. आ शिंदे सर तांदळे सर माळी सर कस्पटे सर चिमण शेट्टे सर बिरादार सर बेल्लेवाड सर क्लार्क सचिन नाबदे सेवक लिंबराज माडे थेरगाव ग्रामस्थ व किलज ग्रामस्थाकडुन कौतुक होत आहे.
0 Comments