Hot Posts

6/recent/ticker-posts

सोयाबीन उत्पादक शेतकरी ' वेट अँड वॉच 'च्या भूमिकेत, दर वाढणार का नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

 


उस्मानाबाद/राजगुरु साखरे: सोयाबीनचे घटते दर पाहून शेतकऱ्यांमध्ये चलबिचल होती, पण मागील दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भविष्यात आणखी भाव वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. मागील आठवड्यामध्ये सोयाबीनचा दर ५९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता, मात्र दि, १८ रोजी ३०० ते ३५० रुपयाने कमी झाला आहे त्यामुळे शेतकरी दर वाढणार का नाही या संभ्रम अवस्थेत असताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी असल्याने आठवडाभरात दरात किंचित वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून व्यापारी सोयाबीनचा साठा करण्यात अधिक रस दाखवत  आहे, ज्या शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंत भाव वाढण्याची आशा आहे , ते शेतकरी वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात घट झाली होती, खरीप हंगामात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .अनेक भागात अतिवृष्टीने फुलोरा व शेंगा भरण्याची अवस्थेतेत हे पीक उध्वस्त झाले आहे, त्यामुळे राहिल्या - सुरल्या सोयाबीनला तर भाव मिळेल या आशेने शेतकरी बसला आहे. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाला होता त्यामुळे यंदाही चांगली भाव मिळतील या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. 

सोयाबीनला सुरुवातीच्या काळात अत्यल्प कमी भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणीच फिरल्याचे चित्र दिसून आले. सुरुवातीच्या काळात ४७००₹ ते ४९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत होता या दरामुळे सोयाबीन लागवडीचा खर्च ही वसूल होतो का नाही या विवंचनेत शेतकरी सापडले होते. आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे त्यामुळे  मागील दोन आठवड्यापासून ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. एकंदरीत यावर्षी उत्पादन कमी झाल्याने भावात आणखी वाढ होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत असल्याने सध्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विक्री करण्याचे थांबवले असून ते ' वेट अँड वॉचच्या ' भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments