उस्मानाबाद/बालाघाट न्युज टाइम्स: मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचा कहर असल्यामुळे विवाह सोहळे साधीपणाने साजरे करण्यात आली होते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे त्या अनुषंगाने घातलेले निर्बंध देखील शिथील झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरी होणार आहेत. लग्नाळुसांठी यावर्षी विवाह मुहूर्ताची चांगलीच रेलचेल असून तब्बल ५९ विवाह मुहूर्त आहेत. तेव्हा कोणता मुहूर्त साधायचा ते पाहायवाच आहे. विवाह सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्याचे अनेकांचे स्वप्न यंदा साकार होणार आहे, हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या लग्नापासून विवाह मुहूर्ताला सुरुवात होत असते. यंदा यंदा तुळशीच्या लग्नापासून सर्वत्र लग्नाचा बार उडवण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी २४ नोव्हेंबरला विवाहाचा पहिला मुहूर्त असून या व पुढील वर्षात जवळपास ५९ विवाह मुहूर्त राहणार आहेत. गत दोन वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मनाप्रमाणे विवाह सोहळे धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. मात्र यावर्षी ती कसर भरून काढण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सध्या विवाह योग्य मुलं-मुलींना स्थळ पाहणे चालू झाली असून अनेकांनी यावर्षी लग्नाचा बार उडवून देण्याचा बेत आखला आहे. यंदा २४ नोव्हेंबर पासून लग्न मुहूर्ताला सुरुवात होत आहे. सन २०२२ मध्ये एकूण १६ विवाह मुहूर्त आहेत. तर पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये तब्बल ४३ विवाह मुहूर्त आहेत.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर महिना : २४, २६, २७, २८, २९
डिसेंबर महिना: २ , ८ , ४ , १४ ,१६ ,१७ ,१८
0 Comments