तुळजापूर:/राजगुरु साखरे: ग्रामपंचायत निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला असून नवीन वर्षा आधीच गावाला नवीन कारभारी मिळणार आहेत. त्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत, राजकारणाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील ४८ गावात राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापू लागले आहे. गावागावांमध्ये वर्चस्वासाठी टोकाची चुरस निर्माण झाली असून स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, या निवडणुकीत तरुणाई जोशात असून ' अभी नही तो कभी नही ' असे समजून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर सुरू झाला आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार आहे.तर २८नोव्हेंबर पासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चा गावातच नव्हे तर प्रत्येक घराघरांमध्ये रात्री उशिरापर्यंत रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायत मधूनच राजकीय प्रवासाला सुरुवात होत असते त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक असते. या निवडणुकीमुळे गाव गाड्यांच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे, मतदाराची मर्जी राखण्यासाठी प्रसंगी गाव पुढारी कर्ज काढेल पण एकही मतदार राजा 'नाराज ' होता कामा नये यासाठी गावागावांमध्ये फिल्डिंगही लागली आहेत. ' स्थलांतरित मतदाराची हमखास गाव भेट '.
मिनी मंत्रालय म्हणून ग्रामपंचायत निवडणूकीकडे पाहिले जाते वार्डनिहाय अतिशय कमी मतदान असल्याने प्रत्येक मतदार निवडणुकीसाठी महत्त्वाचा असतो. सध्या अनेक मतदार रोजी रोटी साठी बाहेरगावी आहेत . नोकरी व्यवसाय निमित्त स्थलांतरित झाली असली तरी त्यांची गावातील मतदार यादीत नावे आहेत. त्यामुळे अन्य निवडणुकीकडे पाठ फिरवणारा मतदार राजा गावकी- भावकीसाठी ग्रामपंचायत निवडणूक साठी हमखास गावी येतो. त्यांना आणण्यासाठी उमेदवाराकडून स्वतः व्यवस्था केली जाते. त्यामुळे स्थलांतरित मतदारांची निवडणुकीनिमित्त हमखास गाव भेट होणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील या गावच्या होणार ग्रामपंचायत निवडणूक ,हंगरगा तूळ, काटी, चिवरी, तीर्थ बुद्रुक, चव्हाणवाडी, दहिटणा, गुळहळी, मानेवाडी, वडगाव लाख, गंजेवाडी, वानेवाडी ,आरबळी, चिकुंद्रा ,देवशिंगा नळ, धोत्री , होनाळा, केशेगाव, माळुंब्रा, मसला खुर्द, मुटॉ/ मानेवाडी, उमरगा चिवरी, ढेकरी, देवशिंगा तूळ, गुजनुर, सलगरा मड्डी, जळकोट वाडी ,खंडाळा , कुन्हसावळी, लोहगाव , मोरडा/तडवळा, सारोळा, वागदरी, शिरगापूर, खुदावाडी ,बोरी, बोरनदवाडी नळ, पांगधरवाडी, सांगवी काटी, सांगवी मार्डी, बोळेगाव, ,कार्ला, आपशिंगा ,नंदगाव , काटगाव, निलेगाव काक्रंबा ,सावरगाव, केमवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
0 Comments