Hot Posts

6/recent/ticker-posts

रामाने केली लक्ष्मणाच्या ऑपरेशनची व्यवस्था गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हसू हीच राम सातपुते यांची कमाई



नातेपुते प्रतिनिधी /विलास भोसले : सामान्य जनतेचे आमदार अशी ओळख असणारे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारात माळशिरस तालुक्यातील कानाकोपऱ्यातून  सर्वसामान्य जनता आपलासा वाटणाऱ्या  विश्वासाने व हक्काने आपल्या समस्या व अडचणी घेऊन आमदार राम सातपुते यांच्याकडे येत असतात  अशाच माळीनगरच्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या ठकुताई खरवडे या आपल्या मुलाच्या आरोग्य बाबत जनता दरबारात आल्या होत्या त्यांचा १० वर्षे वयाचा मुलगा लक्ष्मण याला मूत्राशयाचा त्रास होता त्याच्या ऑपरेशनसाठी सुमारे १ लाख ५० हजार रुपये खर्च सांगण्यात आला होता मोलमजुरी करून जगणाऱ्या ठकुताईंना हा खर्च पेलवणारा नव्हता, पण मुलाचे ऑपरेशन करणे तर गरजेचे होते त्यांनी ही व्यथा आमदार राम सातपुते यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी ताबडतोब लक्ष्मणच्या ऑपरेशनची व्यवस्था करून दिली. आनंदाची गोष्ट म्हणजे पुण्यातील नामांकित रुग्णालयात लक्ष्मणचे मुत्राशयाचे ऑपरेशन यशस्वीपणे व मोफत पार पडले आहे मतदारसंघातील गोरगरीब, सर्वसामान्य जनता त्यांच्या अडीअडचणीत मदतीसाठी हक्काने  जनता दरबारात जाते हा विश्वास सातपुते यांनी आपल्या कामातून कमावला आहे कोणताही पुढारी मध्यस्थी न घालता सामान्य गरीब जनता आमदारांना भेटून आपल्या समस्या सोडवून घेतात गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हसू हीच राम सातपुते यांची  कमाई असल्याचे तालुक्यातील गरीब जनतेला वाटू लागली आहे आरोग्यदूत राम राम सातपुतेे यांच्या जनसेवेचा रथ अविरतपणे सुरूच आहे.               काही दिवसापूर्वीच तालुक्यातील भांबुर्डी  गावचे रहिवासी असलेल्या अल्लाउद्दीन मुलाणी यांच्या कॅन्सर वरील उपचारांसाठी तब्बल ८ लाख रुपये खर्च सांगितला होता परंतु शेतमजुरी व पशुपालन करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मुलानी कुटुंबाला हा खर्च कसा परवडेल असे अल्लाउद्दीदीन यांच्या मुलाााला वाटत होते सातपुते यांना ही हकीगत समजताच त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अल्लाउद्दीन यांची ऑपरेशनची मोफत व्यवस्था करून दिली अल्लाउद्दीन यांच्यावर तब्बल ८ लाख रुपये खर्चाचं ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आलं आमदार  फक्त मदत करून थांबले नाहीत तर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर ते त्यांना भेटायला थेट रुग्णालयात गेले ऑपरेशन तोंडाचे असल्याने अल्लाउद्दीन यांना बोलता येत नव्हते, पण त्यांनी कागदावर लिहून आ. सातपुते यांचे आभार मानलेे तसेच खुडूस येथील सुभाष बनकर यांच्यावर ६:५०  लाख रुपयाचे मुंबईतील बॉंम्बे हॉस्पिटल येथे मोफत ऑपरेशन  झाले.

आरोग्य सेवा ईश्वर सेवा मानणारे आमदार राम सातपुते गरीब रुग्णांसाठी झटत आहेत सर्वसामान्य जनतेचा आरोग्याचा प्रश्न असो अधिकारी कर्मचाऱ्यांकडून  दप्तर दिरंगाईचा प्रश्न असो विद्यार्थ्यांचा प्रश्न असो शेतकऱ्याचा प्रश्न असो जनतेच्या प्रश्नासाठी धावून जाणारे तत्पर आमदार म्हणून माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते यांची ओळख झाली आहे.

Post a Comment

0 Comments