Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथील तरुण शेतकऱ्यांने माळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा..!

 


किलज /राम जळकोटे :अलीकडे शेती परवडत नाही,आता शेतीत काही राहिलं नाही अश्या गोष्टी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात,पण मात्र या अश्या सगळया गोष्टीना फाटा देत, तुळजापुर तालुक्यातल्या माळरानावर देखील नवनवीन  शेतीतील प्रयोग यशस्वी होऊ शकतात ते करुन दाखवलं आहे ते म्हणजे तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथील तरुण शेतकऱ्याने, स्ट्रॉबेरी म्हटलं की  आपल्याला लगेच महाबळेश्वर आठवतं , पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथील विश्वजित भोसले या तरुण शेतकऱ्याने अवघ्या १२ गुंठे क्षेत्रावर  स्ट्रॉबेरीच्या माध्यमातुन शेतीतला प्रयोग यशस्वी केला आहे.
तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथील हा एकमेव तरुण शेतकरी जे की स्ट्रॉबेरीची शेती केल्याचं सांगितलं जातं आहे.स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविता येवू शकते,असे विश्वजीत यांच्या लक्षात आले. स्ट्रॉबेरी हे थंड हवेच्या प्रदेशात येणारे पीक आपल्या परिसरात येईल का ? हा प्रश्न त्यांना सारखा सतावत होता  मात्र त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी पाचगणीला जावून स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबत पूर्णतः माहिती घेतली.त्यानंतर गावात येवून स्ट्रॉबेरीची बाग यशस्वी करुन दाखवण्याचा निर्णय घेतला.विश्वजीत यांनी अवघ्या १२ गुंटे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे.पाचगणीला जाऊन ८ रुपये प्रमाणे विंडर जातीची ४ हजार रोपे आणून शास्त्रशुध्द पध्दतीने त्याची लागवड केलीआहे.

कीड रोगाचे योग्य नियोजन:

स्ट्रॉबेरीवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावरान गाईचे दूध,ताक, गावरान अंडी,दशपर्णी अर्क, वेस्ट डी कंपोजर,जीवामृत आदींची फवारणी करत त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. योग्य नियोजन व परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा स्ट्रॉबेरीचा मळा फुलविला आहे.पाण्याचे योग्य नियोजन केल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथील स्ट्रॉबेरीचा माल सध्या परिसरातील सोलापूर, उस्मानाबाद यांसह परिसरातल्या शहरात जात आहे.मालाचा दर्जा चांगला असल्याने आवक ही मोठ्य प्रमाणावर आहे.सध्या मालाची तोडणी सुरू असून जवळपास १२ गुंठयासाठी त्यांना जवळपास ५५ ते ६० हजार रुपये खर्च आला आहे. तर उत्पन्न ही जवळपास ३ ते साडे ३ लाख रूपये निघेल अशी ग्वाही तरुण शेतकऱ्याने दिली आहे.शेतीत काहीच उरत नाही, शेती परवडत नाही म्हणणाऱ्यासाठी भोसले यांनी आदर्श निर्माण केला आहे. या तरुण शेतकऱ्याने जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर शेतीतील स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करून यशस्वी केला आहे.


Post a Comment

0 Comments