उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील श्री एस पी हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार बालाजी गिराम यांनी उस्मानाबाद येथे दि,१५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे , त्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ. बी.पी गायकवाड , सचिव डॉ एस.पी. गायकवाड , मुख्याध्यापक विजयकुमार गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक वाय . ए . येलुरे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या सत्कार प्रसंगी शाळेतील , शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होत.
0 Comments