तुळजापुर : तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दारासाठी राज्य शासनाकडून १५ कोटी तीर्थ विकास आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर शेळके यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की ,तुळजापुर तालुक्यातील मौजे चिवरी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदीर प्राचिन काळा पासुन जागृत देवस्थान असुन या मंदीरात अनेक जिल्हातुन ,प्रांतातून भाविक भक्त मंगळवार, शुक्रवार पौर्णिमेच्या देवीच्या दर्शनासाठी येतात परंतु सदर भाविकांच्या सोईसाठी कोणतीही उपाय योजना नाही सदर मंदीर परिसरामध्ये चार ते पाच पाणी टाक्या , मंदिरातील दर्शन मंडप , भाविकांना थांबण्यासाठी सभामंडप , भाविकांना राहाण्याची व्यवस्था यात्री निवास, येणाऱ्या भक्तांचे मदत केंद्र , सुलभ शौचालय , या सर्व कामांसाठी तसेच मंदीर परिसरातील विविध विकास कामांसाठी १५ कोटी राज्य शासनाने तिर्थ विकास चिवरी महालक्ष्मी मंदीरचा आराखडासह निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर ,तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगतसिंग पाटील यांनीपण आपल्या फंडातुन मौजे चिवरी देवस्थान साठी विकास निधी द्यावा तसेच श्री महालक्ष्मी देवीच्या मंदीरासाच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाकडे तिर्थ विकास निधीसाठी पाठपुरावा करान .
अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे .यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष मधुकर शेळके , नागनाथ कोल्हे, रोहित शेंडगे आदी उपस्थित होत.
0 Comments