चिवरी: तुळजापूर तालूक्यातील ४८ ग्रामपंचायतसाठी रविवारी दि, १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मौजे चिवरी गावचा समावेश होता या निवडणुकींमध्ये भाजप पुरस्कृत बळीराजा ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत बळीराजा ग्रामविकास पॅनलने ११ जागेपैकी पैकी ७ जागेवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीचे महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलला ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये बळीराजा ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाच्या विजयी उमेदवार कमल पंडित बिराजदार या १३४ मताने विजय झाल्या आहेत ,तर सदस्य पदासाठी विजयी उमेदवार रवी भीमा देडे, निर्मला लक्ष्मण लबडे , स्वाती नीलकंठ स्वामी, दीपक विजय पाटील , कविता लक्ष्मण मेंढापुरे, तुकाराम नारायण देशमुख , मिलिंद मारुती होगाडे यांचा समावेश आहे. तर महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल मध्ये बालाजी ज्ञानदेव पाटील , लता उत्तम चिमणे , रंजना शशिकांत झांबरे, अश्विनी सचिन शिंदे यांनी विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल बळीराजा ग्रामविकास पॅनलचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुलालाची मुक्त उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
0 Comments