यंदा तालुक्यात ज्वारी पीक बहरले

Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा तालुक्यात ज्वारी पीक बहरले


 तुळजापुर : यावर्षी तुळजापूर तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच पाऊस होत गेल्याने मुबलक पाणीसाठा  झाला आहे, मात्र यंदा ऑक्टोंबर अखेरपर्यंत पाऊस लांबल्यामुळे रब्बीच्या पेरणे खोळंबल्या होत्या त्यातच खरिपातील पिकांचे अतिवृष्टी ,सततचा पाऊस यामुळे मोठे नुकसान झाले होते ,   शेतकऱ्यांनी हताश न होता कशीबसे  पैशाची जुळवाजुवळ करून रब्बीची पेरणी केली आहे. सध्या परिसरात गहू ,हरभरा ,ज्वारी, करडई ,मका आदि पिकांची लागवड केली आहे, ज्वारी पेरणी केल्यापासून अधून मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने ज्वारी पिकांना पोषक ठरत आहे, त्याचबरोबर लवकर पाणी देण्याची गरज भासत नाही, त्यामुळे सद्यस्थितीत ज्वारी  पीक परिसरात बहरले आहे. मागील दोन-तीन वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे, त्यामुळे यावर्षीही खरीप हंगामातील आता तोंडाशी आलेले पिके गेल्याने आता परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बीतील पिकावर मदार ठेवली आहे.

Post a Comment

0 Comments