भगवती देवी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी
नाईचाकुर /प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर (भगतवाडी )येथील उंच डोंगरावर बसलेली भगवती देवीची यात्रा दि,२४ रोजी उत्साहात साजरी झाली. पहाटे चार वाजता देवीचे पुजारी सुधाकर मेकाले यांनी देवीला अभिषेक करून खणा नारळाने ओटी भरली भाविक भक्तांनी सकाळपासुन देवीची दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी चोक बंदोबस्त करण्यात आला होता.जगदंबा देवीचे ट्रस्ट रावसाहेब पवार व त्यांचे सदस्य यांनी व्यापाऱ्यांची व देवीच्या भक्तांना पाण्याची व्यवस्था केली होती .कोरोना मुळे मागील दोन वर्ष यात्रा भरली नव्हती यावर्षी भाविक भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी केली होती ,पोलीस प्रशासक व जगदंबा देवीचे वतीने कोरोनाचे नियम पाळण्यासाठी मास्क लावण्याची भाविक भक्तांना आव्हान करत होते नाईचाकूर व परिसरातील बाहेरगावी असलेले नागरिक दिवाळीत आपल्या गावी येत नाहीत पण आपल्या देवीच्या यात्रेला वेळ अमावस्येला आवर्जून येतात. आपल्या सासरी गेलेल्या लेकींना यात्रेला येण्याचे निमंत्रण देतात देवीचे दर्शन व देवीला नवस फेडण्यासाठी येतात ..नवसाला पावणारी भगवती देवी आहे भाविक भक्त उंच डोंगरावर बसलेल्या भगवती देवीला डोंगराच्या कडेने मी पाच दोन फेऱ्या घालुन व खना नारळाची ओटी बरेन असे नवस बोलतात व भगवती देवीचा नवस फेडतात .यात्रेचे मुख्य आकर्षक म्हणजे आराध्याचा निघालेला छबिना भाविक भक्त सकाळी आल्यानंतर देवीचे दर्शन घेतात व यात्रेचे खरेदी करतात पण पण देवीचा छबिना निघाल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाहीत छबीन्यात आराधी मंडळी आपल्या घरातील परडी माळ पोत घेऊन देवीला भेटवण्यासाठी येतात व छबिना निघाल्यानंतर आपली पोत घेऊन .डोंगराच्या पायथ्यापासून छबिना निघतो व डोंगराला फेऱ्या घालून छबिनाची सांगता रोते.
0 Comments