चिवरी/राजगुरु साखरे: तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायतची सत्तासुञे महिलांच्या हाती आली आहेत. चिवरी ग्रामपंचायतीवर सरपंच ,उपसरपंच दोन्ही महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी दि,६ रोजी सरपंच सौ कमलबाई पंडित बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली यावेळी तीन उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते ,यातील एकाने नामनिर्देशक पत्र मागे घेतले. यावेळी उपसरपंच पदासाठी बळीराजा ग्रामविकास पॅनलच्या सौ निर्मला लक्ष्मण लबडे व महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलच्या सौ रंजना शशिकांत झांबरे यांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे उपसरपंच पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले , यात सौ निर्मला लबडे यांना ७ मते मिळाली तर प्रतिस्पर्धा सौ रंजना झांबरे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. निर्मला लक्ष्मण लबडे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून विस्ताराधिकारी एस. बी .तांबोळी यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक के.ए.केवलराम ,पोलीस पाटील योगेश बिराजदार, संगणक चालक शंकर झिंगरे ,ग्रामपंचायत पंचायत लिपिक अनिल देडे रोजगार सेवक तानाजी जाधव ,कल्याण स्वामी ,धनाजी कोरे यासंह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होत.
0 Comments