उस्मानाबाद: बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली. यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. दि २१ पासुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा होता. यात बोर्डाच्या कामकाजाचा सावळा गोंधळ समोर आला या झालेल्या चुका मुळे विद्यार्थी बराच वेळ संभ्रमात पडले होते. काल झालेल्या बारावी इंग्रजी परिक्षाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तरे छापून आली होती. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचीच बाब झाली आहे. यावरून विद्यार्थी व शिक्षकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
यावर बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी बाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा आयोजित करण्यात येईल. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments