उस्मानाबाद: लिंगायत महासभेच्या वतीने बसवकल्याण जिल्हा( बिदर) येथे दि,४ ते ५ मार्च रोजी लिंगायत महासभेचे आयोजन करण्यात आले आहे श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या ऐतिहासिक बसवकल्याण नगरीत राष्ट्रीय लिंगायत महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशासह विदेशातील लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकातील व महाराष्ट्रातील काही लिंगायत व संघटनांनी या अधिवेशनास पाठिंबा दिला असून ते नियोजनात सक्रिय काम करीत आहेत. ऐतिहासिक अशा बसवकल्याणमध्ये प्रथमच राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. ४ व ५ मार्च रोजी बसवकल्याण येथील थेर मैदानात आयोजित या अधिवेशनात लिंगायत धर्म, इतिहास, परंपरा, साहित्य, संस्कृती, लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर अभ्यासक, साहित्यिक, लेखक, विचारवंत व विविध मठांचे मठाधीश मार्गदर्शन करतील. या अधिवेशनाचे उद्घाटन न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या शुभहस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत गो .रू. चनबसप्पा राहणार आहेत .याशिवाय अधिवेशनात महिला सत्र, युवा सत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे.यावेळी देशातील विविध राज्य व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत.तसेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोटजातींतील समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार असून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक लिंगायतमहासभेद्वारे करण्यात आले आहे.
0 Comments