कळंब: जमीन अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथअण्णा तोडकर आणि लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गायरान आणि वन जमीन हक्क धरणे आंदोलन काल दिनांक २० मार्च रोजी आझाद मैदान येथील उस्फूर्तपणे संपन्न झाले.आणी दगड खाणं कामगार संघटनेच्या बस्तु रेगे यांच्या नेतृत्वामध्ये आपला सहभाग नोंदवला... स्वराज अभियानाचे सुभाष लोमटे यांनी गायरान धारकांना संघटना बळकटीकरणाचे मार्गदर्शन केले.
जमीन अधिकार आंदोलनाच्या नेतृत्वात मराठवाड्यातून हजारो गायरान धारक आझाद मैदानावर जमा झाले होते. उत्तर महाराष्ट्रातून लोक संघर्ष मोर्चाचे हजारो गायरानधारक सहभागी झाले होते.वहिती गायरान जमिनीचे पट्टे मालकी हक्काचे झाले पाहिजेत... आणि राहत्या घराची जागा नावे झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलकांनी काल दिवसभर आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन केले.
या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील जाहीर पाठिंबा देऊन विधिमंडळामध्ये पारधी समाजाच्या घराचा प्रश्न विधिमंडळात मांडून आंदोलकांचे मनोबल वाढवलं.... काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करून जाहीर पाठिंबा व्यक्त केला... त्यानंतर खासदार काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केलं..
आझाद मैदानावरील आंदोलनाची विधिमंडळाने दखल घेतली.. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला.हायकोर्टातील वकील गायत्री सिंग आणि बी आर एस पी चे प्रमुख एडवोकेट सुरेश माने साहेब यांनी आंदोलकांना हायकोर्टातील केस बाबत मार्गदर्शन केले.
अधिकार आंदोलना चे रमेश भिसे. प्रभा यादव, शबाना शेख, भूमिपुत्र वाघ, बजरंग ताटे, दशरथ जाधव, विश्वनाथ गवारे बायजाबाई घोडे सुनील नेमाने नागनाथ चव्हाण कमलाकर चिकटे विष्णू आचार्य, माया शिंदे, बालाजी शिंदे, बाबा पोटभरे, अण्णाराव सूर्यवंशी इत्यादी प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या गायरानधारकांना मार्गदर्शन केले आणि आंदोलनाची ऊर्जा वाढवली..
मंत्रिमंडळांनी आंदोलनाच्या शिष्टमंडळास भेट देण्याच्या साठी निमंत्रित केल्यानंतर गायरांधारकांच्या वतीने विश्वनाथअण्णा तोडकर, प्रतिभाताई शिंदे, रमेश भिसे, प्रभा यादव, आणि बस्तु रेघे यांनी शिष्टमंडळाद्वारे,, राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ रावजी शिंदे साहेब.. यांची भेट घेतली.. आणि निवेदन दिले.. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रश्नावर विधिमंडळाची नंतर तातडीने बैठक लावण्याचे मान्य केलं... त्यानंतर ग्रामविकासमंत्री श्री. गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि सविस्तर माहिती दिली.मंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतर ताबडतोब या प्रश्नावर बैठक आयोजीत करण्याचे मान्य केले.
निजाम काळापासून मराठवाड्यामध्ये गायरानाच्या पट्ट्याची मालकी हक्क देण्याची गोष्ट प्रलंबित आहे वर्षानुवर्ष लोक गायराना चा पट्टा मिळण्याची अपेक्षा करत आहे महाराष्ट्रात किमान पाच लाख वहितीधारक आहेत आणि किमान 25 लाख घर मालकी हक्क मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत सरकारने तातडीने याची दखल घेतलीच पाहिजे अशी भूमिका विश्वनाथ तोडकर अण्णा यांनी मंत्रिमंडळासमोर व्यक्त केली.... मंत्री महोदय यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि विधिमंडळ अधिवेशननंतर तातडीने बैठक लावण्याचे मान्य केलं..महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातून आलेल्या गायरानधारकांना या मिळालेल्या आश्वासनामुळे आणि शासनाने गायरान मालकी हक्क मिळण्याच्या बद्दल सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे गायरान वही ती धारकांना आणि प्लॉट धारकांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments