Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ९१८ व्या जयंतीनिमित्त दि,२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३३ बहाद्दराने रक्तदान केले. हे रक्त सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर येथे संकलित करण्यात आले.यावेळी युवा नेते सचिन बिराजदार, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, अतुल पाटिल,सुधीर झिंगरे,भिमा होगाडे, अभय साखरे,नारायण देशमुख,प्रविण झिंगरे ,सुशिलकुमार शिंदे,चैतन्य बिराजदार वैभव मनशेट्टी, बाबुराव झिंगरे आदीसह बसवभक्त, सिद्धेश्वर ब्लड बँकेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments