धाराशिव: उन्हाळ्याची वर्दी देणारा मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याचे आगमन झाले आहे वसंत ऋतूतील सूर्य आपले डोके हळूहळू वर काढत आहे. एप्रिल महिना म्हटले की कडाक्याची ऊन ठरलेलेच त्यामुळे उन्हाळ्यात गारेगार पाणी प्यायला मिळावे म्हणून कुंभार समाजाने मोठ्या प्रमाणात माठ निर्मिती केली आहे मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये ही ऊन पावसाचा खेळ चालूच आहे, दिवसेंदिवस उकाड्यामध्ये वाढ होत आहे, नागरिकांना थंड पाण्याची गरज भासत आहे त्यामुळे माठ खरेदीला वेग आला आहे. माठ(डेरा) तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाच्या किमती कच्चा वाढल्याने आपुकसच यंदा माठाच्या किमतीत काही अंशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बऱ्याचदा माठाचा उल्लेख गरीबाचा फ्रिज म्हणून केला जातो, माती पासून तयार झालेला डेरा कमी किमतीत व सहज उपलब्ध होतो यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने माठाला गरीबाचा फ्रिज म्हणून ओळखली जाते. आजच्या विज्ञान युगात सर्वसामान्यांच्या घरात थंड पाण्यापासून तर दुग्धजन्य पदार्थ, फळे भाजीपाला, शिजवलेले अन्न ताजे राहावे म्हणून आधुनिक युगात सर्रास फ्रिजचा वापर केला जातो. मात्र असे असताना देखील थंडगार पाणी पिण्यासाठी आजही अनेकांचा ओढा मातीच्या माठाकडे कायम असल्याचे चित्र ग्रामीण भागासहची शहरी भागात दिसून येत आहे.
मागील काही दिवसापासून जिल्ह्याचे तापमान वाढू लागले आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवु लागला आहे सकाळी ११ नंतर सूर्य आग ओकत आहे त्यामुळे जीवाची काहीली होऊ लागली आहे, मातीच्या माठात अनेक आरोग्यासाठी उत्तम गुणधर्म असल्याने माठाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. त्या दृष्टीने कुंभार व्यवसायिकही माठ बनवण्यास मग्न झाले असून माठ विक्रीस बाजारात उपलब्ध झाली आहेत.
एकंदरीत ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील बाजारपेठेतही माठ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी ठाण मांडल्याचे दिसत आहे. आरोग्यासाठी उत्तम गुणधर्म असलेले माठातील पाणी पिण्यासाठी नागरिकांचा माठ खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. नागरिकांवर आधुनिकीकरणाचा मोठा परिणाम पडला असला तरी अनेक नागरिकांचा कल आजही माठातील थंडगार पाण्याकडे असल्याचे पहावयास मिळत आहे.
यंदा माठाच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ
जिल्हा परिसरातील आठवडी बाजारात माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत, तोटी असलेल्या माठाची किंमत २२०₹, तोटी नसलेला २००₹ तर माठ (डेरा) १०० ते १५० रुपयांमध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाईमुळे ५० रुपयांची वाढ झाली आहे.
उन्हाची काहिली वाढताच पंखे ,कुलर, एसी दुरुस्तीची लगबग सुरू
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढताना दिसून येत असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी कुलर पंखे एसी दुरुस्ती करण्यासाठी लगबग सुरू केली आहे तर काही नागरिक नवीन एसी कुलर पंखे खरेदी करत आहेत.
0 Comments