धाराशीव : राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांना जरी या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. द्राक्षे, आंबा, टरबूज, संत्रा, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धाराशीव जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल अक्षरशः धुमाकूळ घातला येडशी, शिराढोण, तडवळा, वाडी आणि बामणी या भागात गारांचा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करुन फळबागा लावल्या आहेत. अहोरात्र मेहनत करुन फळबागा जगवल्या आहेत. मात्र, अवकाळी पावसात हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
वाडी बामणी येथील बाबासाहेब उंबरदंड यांनी दिड एकरवर व्यंकट जातीचे कलिंगड लागवड केली होती. यासाठी त्यांनी पावणे दोन लाख रुपये खर्च केला होता. यातून ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळणार होते. पुढील ४ दिवसात तोडा होणार होता. मात्र, काल झालेल्या गारपिटीत कलिंगड मातीमोल झाले.
![]() |
बाबासाहेब उंबरदंड यांच्या कलिंगड शेतीचे झालेले नुकसान |
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सिताबाई सुरवसे, तानाजी सुरवसे, शिवाजी सुरवसे यांची द्राक्ष बाग जमिनदोस्त झाली आहे. सुरवसे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
![]() |
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सीताबाई सुरवसे या शेतकऱ्यांची दोन एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्याने भुई सपाट |
राज्यात मागील ३ ते ४ वर्षात दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालं आहे. पण अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पुरत हाल झालेले आहे. एकंदरीत पाठीमागील शुक्ल कास्ट काही केल्या कमी होत नाही कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.
0 Comments