Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून १२ लाखाची मदत सुपूर्द |Dr.Tanaji Sawant Yanchyakadun Bara Lakhachi Madat Surpudra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून १२ लाखाची मदत सुपूर्द |Dr.Tanaji Sawant Yanchyakadun Bara Lakhachi Madat Surpudra


धाराशिव: मागील आठवड्यामध्ये धाराशिव जिल्हा परिसरात अवकाळी व गारपीटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  होते. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील मोर्डा आणि धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM.Ekanath Shinde) यांनी जिल्ह्यातील गारपिटीने नुकसान  झालेल्या   भागाची पाहणी दोन दिवसांपूर्वी केली होती मुख्यमंत्री यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांना तानाजी सावंत यांच्याकडून १२ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री यांनी तुळजापूर तालुक्यातील  मोर्डा येथील  गावातील द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांच्या द्राक्ष बागेला भेट दिली होती सीताबाई यांची पूर्ण द्राक्ष बागेचे गारपीटने होत्याचे नव्हते झाले होते,   मुख्यमंत्री व तानाजी सावंत पाहणी करण्यासाठी आले असता  या महिलेने हंबरडा फोडत आता आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही मदत करा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली असता मी माझ्या कडून वैयक्तिक  दहा लाख मदत करण्याचे आश्वासन डॉ तानाजी सावंत यांनी दिले होते त्यावर आज सावंत यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील  सीताबाई सुरवसे  यांना दहा लाख रुपये  तर  टरबूज उत्पादक धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील शेतकरी बाबासाहेब उबरदंड यांना दोन लाखाची मदत दिली असून मुख्यमंत्री बांधावरून परतून दोनच दिवसात  मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री डॉ तानाजी सावंत शिंदे फडणवीस सरकारचे  आभार मानले आहेत.

यावेळी उपस्थित मा.जि.प उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत ,अनिल भाऊ खोचरे ,दत्ता बापू मोहिते ,गौतम लटके सर ,धनंजय पाटील , शेतकरी बांधव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments