इटकळ येथील पोलीस पाटील विनोद सलगरे यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मान | Vinod Salgare, Police Patil from Itkal, honored with the Outstanding Police Patil Award
पोलीस पाटील विनोद सलगरे यांचा सन्मान करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे
इटकळ /प्रतिनिधी :- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विनोद सलगरे यांचा तुळजापुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती डॉ.सई भोरे पाटील व नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान.मौजे इटकळ येथील तरूण कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी गाव पातळीवर गाव कामगार पोलीस पाटील म्हणून काम करीत असताना पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनास वेळोवेळी अचुक अशी मदत केली म्हणून सन २०२२-२०२३ मध्ये पोलीस पाटील म्हणून गाव पातळीवर समय सुचकतेने काम केले असल्याने पोलीस पाटील विनोद सलगरे यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील (Dr.Sai Bhore Patil ) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. शांत संयमी हुशार व समय सुचकतेचे भान ठेऊन गावं पातळीवर पोलीस पाटील म्हणून उत्कृष्ट काम करणारे विनोद सलगरे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केल्याने मिञ परिवार व इटकळ ग्रामस्थांमधुन पोलीस पाटील विनोद सलगरे यांचे कौतुक केले जात आहे.
0 Comments