अवकाळी पाऊस वीजांपासून मनुष्य, पाळीव प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करा : सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी !
नातेपुते /प्रतिनिधी : हवामान अभ्यासक मा श्री पंजाबराव डख यांनी राज्यात दिनांक २४ एप्रिल पासून २ मे दहा दिवस विजा , वारे , पाऊस, गारपीठ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अमुल्य मानव जात , मौल्यवाण पशुधन , राष्ट्रीय संपत्ती चे संरक्षण करणेसाठी सर्वानी विज पूर्वकल्पना देणारे दामिनी अॅप अपलोड करावे .
शेतकऱ्यांना विजांसह होणाऱ्या पावसाचा अंदाज कळावा तसेच अंदाजाप्रमाणे शेती आणि शेतातील कामाचे यथोचित नियोजन करण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने ‘दामिनी हे मोबाईल ऑप्लिकेशन विकसित केले आहे.
दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनमुळे शेतकरी बांधवांना वादळी पाऊस तसेच विजेच्या कडकडाटाचे पूर्वानुमान अर्धा ते एक तास आधी मिळणार आहे.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी मोबाईल अँप्लिकेशन विकसित केले असून त्याच्या वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुधन तसेच शहरी भागातील विजेच्या कोसळण्यामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे.
उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी या मोबाईल अँप्लिकेशनसाठी लाईटनिंग लोकेशन मोडेल विकसित केले असून माहितीचे संकलन करण्यासाठी निरनिराळ्या भागात सेन्सर बसविले आहे.
दोनशे कि.मी. पर्यंत होणाऱ्या विजेच्या घडामोडी जाणून घेण्याची क्षमता ही प्रत्येक सेन्सर मध्ये आहे
दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनद्वारे शेतकरी तसेच नागरिकांना विजांच्या कडकडाटाचा अंदाज अर्धा तास आधी मिळत असल्यामुळे त्यांना शेतात काम करताना सुरक्षितस्थळी जाणे शक्य होणार आहे.
वादळी वाऱ्यांबरोबर होणारा पाऊस आणि वीज कोसळण्याच्या संभाव्य आपत्ती टाळणे शक्य होणार आहे. यासाठी दामिनी अँप अन्डॉईड मोबाईल मध्ये डाऊनलोड करून वापर करण्याचे अहवान शेतकरी व शेतमपूर बंधूनी करावे असे अहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.
दामिनी अँप डाऊनलोड करण्यासाठी इथे लिंक करावे
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini
0 Comments