दुर्दैवी घटना: कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागुन महिला जागीच ठार, गोगाव येथील घटना |
मयत अश्विनी मुनघाटे
गडचिरोली: कडाक्याच्या उन्हामुळे सध्या अंगाची लाही होत आहे, या उखाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सायंकाळी कुलर मध्ये पाणी टाकत असताना अचानक विद्युत शॉक लागल्याने गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव येथील विवाहित महिला जागीच ठार झालीची घटना सोमवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली . अश्विनी राकेश मुनघाटे असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेमुळे जिल्हा मुख्यालयासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अश्विनी मुनघाटे या सायंकाळी कुलर मध्ये पाणी टाकीत असताना अचानक विद्युत शॉक लागला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आले, पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासनीनंतर अश्विनी मूनघाटे यांचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दि,१८ एप्रिल रोजी वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती ,दोन मुली, सासू ,सासरे, बहिण, भाऊ असा परिवार आहे.
सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये सूर्याचा प्रकोप वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. या उकाड्यापासून बचावासाठी नागरिकांनी कुलर पंखे सुरू केली आहेत. मी सध्या उकडापासून बचाव करणाऱ्या कुलर पंखे यांचा वापर करीत असताना योग्य काळजी घेण्याची आव्हान वीज वितरण करून करण्यात आले आहे. नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटनेला सामोरे जावे लागत आहे.
0 Comments