सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ,२ आरोपींची निर्दोष मुक्तता धाराशिव न्यायालयाचा मोठा निकाल
धाराशिव: चारिञ्याचा संशय व हुंडा न दिल्याच्या रागातुन पत्नीची गोळ्या झाडुन हत्या केल्याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेप व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी हा निकाल सुनावल्याची माहिती अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रश्मी नरवाडकर यांनी दिली.
सपोनी चव्हाण हे कारागृहात अटक झाल्यापासून कारागृहात आहेत, हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत ( अंडर ट्रायल) हे चालवले हे विशेष ,हे हत्याकांड त्यावेळी राज्यभर गाजले होते.आरोपी चव्हाण यांनी पत्नीला गोळी घालून खुन केल्यानंतर हे प्रकरण लपवण्यासाठी काही पुरावे नष्ट केले त्यामुळे कलम २०१ अंतर्गत सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे, दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रश्मी नरवाडकर यांनी बाजू मांडली.
येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पत्नी यांना 25 जानेवारी 2018 रोजी छातीत गोळी लागल्याने गंभीर अवस्थेत बार्शी येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यांचा विवाह 2014 साली झाला होता, हे दाम्पत्य येरमाळा येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते , लग्नाला तीन वर्षे झाली तरी मूल होत नाही या कारणावरून नैराश्यातून मोनाली यांनी पतीच्या सर्विस रिव्हालवरमधुन गोळी झाडून आत्महत्या केल्याचे कारण चव्हाण कुटुंबियाकडून सांगण्यात आले.
मयताचा अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्याच दिवशीं मोनालीचे वडील शशांक जालिंदर पवार (रा.चौसाळा जि.बीड) यांनी मुलगी मोनाली हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याची फिर्याद मला पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चारित्र्याच्या संशयावरून व हुंड्यातील राहिलेले पाच लाख रुपये आणावे यासाठी मुलीचा जाच होत होता. यातून तिचा सासरच्या लोकांकडून खुन केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
या फिर्यादीनुसार मृताचे पती पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सासरा बापू व सासू विमल चव्हाण यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०२,४९८ अ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. यात सासू विमल चव्हाण व बापू चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला, या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात याप्रकरणी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावली झाली.
सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले, साक्षीपुरावे नंतर समोर आलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांना 302 अन्वये जन्मठेप व ५० हजार रुपये दंड तर आरोपीने पुरावा नष्ट केल्याने सात वर्षाची सश्रम कारावासाची सश्रम १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या प्रकरणामध्ये सासु विमल चव्हाण व सासरा बापू चव्हाण यांची न्यायालयाने सबळपुराव्या आधारे निर्दोष मुक्तता करण्यात आली.या गुन्हात सपोनी चव्हाण हे अटक झाल्यापासून कारागृहात होते. हे प्रकरण आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवून चालवण्यात आले. विवाहतीचे वडील शशांक पवार हे शिरूर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.
0 Comments