Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग शिवारात वीज कोसळून दोन म्हशी ठार|Two buffaloes were killed by lightning in Naladurg Shiwar

नळदुर्ग शिवारात वीज कोसळून दोन म्हशी ठार 


नळदुर्ग : नळदुर्ग  परिसरात मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून रविवारी दि, 7 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटस पावसात वीज कोसळुन दोन म्हशी ठार झाल्याची दुर्घटना नळदुर्ग शिवारात घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नळदुर्ग परिसरामध्ये दिनांक 7 मे रोजी दुपारी  चार ते पाच वाजता सुमारास ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात पाऊस झाला , यामध्ये नळदुर्ग  शिवारातील सर्वे नंबर 112  मधील शेत जमिनीत बटईने  करणारे वागदरी ता. तुळजापूर येथील शेतकरी बाबासाहेब कुंडलिक वाघमारे यांची लिंबाच्या झाडाखाली बांधलेली म्हैस व याच सर्वे नंबर मध्ये बटईने शेतजमीन करणारे वागदरी ता तुळजापूर येथील अंबादास सदाशिव भोसले यांची एक म्हैस अशी एकूण दोन म्हशींचा विजेच्या प्रकोपात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


सदर घटनेची माहिती मिळताच नळदृग महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी जे एस गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी खाडे, यांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा  केला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments