महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कविता
विषय ÷ महाराष्ट्र गौरव
शिर्षक÷महाराष्ट्र माझा
====================
मावळ मातीचा
शूर जातीचा
तलवारीच्या पातीचा
महाराष्ट्र माझा ॥१॥
जाणता राजा शिवछत्रपतीचा
वीरपुत्र शिव शंभूराजांचा
शिवपुत्र छत्रपती राजारामाचा
महाराष्ट्र माझा ॥२॥
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा
न्यायप्रिय होळकर अहिल्यांचा
स्वराज्यासाठी लढणार्या ताराबाईचा
महाराष्ट्र माझा॥३॥
झाशीची राणी लक्ष्मीबाईचा
कतृर्त्ववान रमाई भिमाईचा
विद्येची सरस्वती सावित्रीचा
महाराष्ट्र माझा॥४॥
सह्याद्रीच्या कड्या कपारीचा
सातपुड्यांच्या उंच रांगांचा
गड,तट बुरुजांचा,इतिहासांचा
महाराष्ट्र माझा ॥५॥
हातात पोत घेणार्या पोतराजांचा
कवड्यांच्या माळा घातलेल्या आराध्यांचा
हर हर महादेव चा गजर करणार्या मर्दाचा
महाराष्ट्र माझा ॥६॥
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा
कोल्हापुरच्या आई अंबेचा
जेजुराच्या खंडेरांचा
महाराष्ट्र माझा ॥७॥
ताठ मानेचा
राकट बाणेचा
पोलादी मनगटांचा
महाराष्ट्र माझा ॥८॥
काळ्या मातीचा
मर्दानी छातीचा
सळ सळत्यां रक्ताचा
महाराष्ट्र माझा ॥९॥
पैठणच्या नाजुक पैठणीचा
कोल्हापूरच्या पैलवानांचा
सातार्यांच्या गुलछडींचा
महाराष्ट्र माझा ॥१०॥
क्रांतीसुर्य महात्मा फुलेंचा
राजर्षि शाहू महाराजांचा
महामानव डाॅ.आंबेडकरांचा
महाराष्ट्र माझा ॥११॥
स्वातंत्र्य,समता,बंधुतेचा
पुरोगामी प्रबोधनकारांचा
लोकशाही जागविणारा
महाराष्ट्र माझा ॥१२॥
====================
लेखन : श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर(सहशिक्षक)
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद .
मो.नं. ÷ ९७६४५६१८८१
0 Comments