ऊन्हाची काहिली वाढल्याने नदी विहिरीवर पोहण्यासाठी मुलांची गर्दी
धाराशिव: यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलांना आठ दिवस अगोदर उन्हाळी सुट्ट्या मिळाले आहेत. सध्या मे महिना संपत आला तरी उन्हाचा तडाखा वाढल्याने अंगाची लाही लाही होत असून त्यामुळे मुलांची नदी विहिरीवर पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दिवसभरामध्ये पाण्यामध्ये डुंबण्यासाठी मुले आनंदाने शेतशिवाराकडे जात आहेत. ग्रामीण भागात गावोगावी नदीवर विहिरीवर बालगोपाळांची पोहण्यासाठी गर्दी दिसत आहे. परंतु यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पालकांची जबाबदारी वाढली आहे. वाढते तापमान वाढीमुळे शहरी मुलांचा मोर्चा गावाकडे वळला आहे, त्यामुळे मुले शेत शिवारात मनमुराद रानावनात रानमेवाचा आनंद लुटत आहेत.उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता मुलांची पावले नदी तलाव , शेततळे ,विहिरीकडे पालकांचा डोळा चुकवून वळली जात आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी वाढत असून ज्या मुलांना पोहता येत नाही ,अशा मुलांच्या बाबतीत या ठिकाणी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलावर वेळीच सावध होऊन नजर ठेवणे गरजेचे आहे.
0 Comments