Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कविता

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कविता

 ⛔ रणरागिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन⛔



====================


न्यायप्रिय माझी अहिल्या

राजमाता होत्या अहिल्या

स्वराज रक्षक अहिल्या

होळकरांच्या सुन अहिल्या  ॥१॥


देवालय ,मंदिरे बांधणार्‍या अहिल्या

धरणे,तलाव बांधणार्‍या  माझ्या अहिल्या

सामाजिक न्यायासाठी लढणार्‍या अहिल्या

समता बंधुतेसाठी झगडणार्‍या अहिल्या ॥२॥



सती न जाणार्‍या माझ्या अहिल्या

निष्ठेने राज्य चालवणार्‍या अहिल्या

नितीमुल्य जपणार्‍या माझ्या अहिल्या

देवत्वांच रक्षण करणार्‍या माझ्या

अहिल्या ॥३॥



देव देश धर्मासाठी झुंजणार्‍या अहिल्या

मराठी साम्राज्य समृध्द करणार्‍या अहिल्या

स्री स्वातंत्र्य ,समानता जपणार्‍या अहिल्या

मराठी मन बळकट करणार्‍या अहिल्या  ॥४॥



दिल्लीच तख्खत ही हलवणार्‍या अहिल्या

शौर्य ,वीर ,पराक्रमी रणरागिनी अहिल्या

होळकर घरणांचा इतिहास राखणार्‍या अहिल्या

स्री स्वातंत्र्याचा आवाज होणार्‍या  

अहिल्या  ॥५॥



====================


श्री.पंकज रा.कासार काटकर


मु.पो.काटी.ता.तुळजापुर


जि.धाराशिव


मो.नं.÷१) ९७६४५६१८८१


             २)८३२९८६३१२१

Post a Comment

0 Comments