नळदुर्ग - अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील मावेजासाठी बाधित शेतकरी आक्रमक , शेतकऱ्याची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
नळदुर्ग: नळदुर्ग अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांना मावेजा मिळू नये, या उद्देशाने न्यायालय व शासनाची दिशाभूल करीत शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाधित शेतकरी , शेतकरी संघर्ष समिती वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व महसूल मंडळ अधिकारी श्री गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजी नगर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कार्यकारी अभियंता शेळके यांनी बिनबुडाचे आरोप करीत शेतकऱ्याची बदनामी केली आहे या प्रकरणी त्याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करून शेतकऱ्यांच्या बाधित होणाऱ्या जमिनी संपादित करून त्यांचा योग्य मावेजा द्यावा. तसेच तुळजापूर भूमी अभिलेख उपाधीक्षक हे बेकायदेशीर शेतकऱ्यांना नोटीसा देत असून हा होणारा त्रास थांबवावा, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा हा आकांक्षीत व आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने आयुष्यमान भारत योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.
या निवेदनावर सरदार सिंह ठाकुर, व्यंकट पाटील, दिलीप जोशी ,चंद्रकांत शिंदे, दिलीप पाटील ,काशिनाथ काळे, बंडू मोरे महादेव बिराजदार, गणपत सुरवसे , योगेश सुरवसे, बालाजी ठाकूर, प्रतापसिंह ठाकुर, प्रशांत शिवगुंडे, बाळ लोंढे, दयानंद पाटील ,लोहार दयानंद, कल्याण शेट्टी ,अशोक पाटोळे, विक्रम निकम, पंडित निकम, सुभाष पाटील, लक्ष्मण पाटील, चिमाजी हंताळे, काशिनाथ घोंगडे, गवळण हंताळे, सुनिता पाटील, तुकाराम सुरवसे ,प्रभाकर मोरे, दिलीप मोरे, गप्पूर मुल्ला, राजेंद्र पवार ,संगीता मोरे, अनिता मोरे, श्यामलबाई मोरे, सुमनबाई पाटील, सुलताना शहा, नवाज शेख, सादिक पटेल, अर्जुन मोरे, विष्णू मुळे, शिवाजी मोरे, रहमान शेख, भास्कर सुरवसे, संतोष फडतरे, निळकंठ पाटील, आजमुद्दिन शेख, जहरोद्दीन शेख, इसामुद्दिन शेख, अशोक जाधव ,चंद्रकला जाधव,वाहीदाबी शेख आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.
0 Comments