तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी पाटील ,तर उपसभापतीपदी बोबडे यांची बिनविरोध निवड|
तुळजापुर: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भाजपचे सचिन पाटील तर उपसभापतीपदी संतोष बोबडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच गुलालाची मुक्त उधळण करीत, नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाने 18 पैकी 14 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व केले आहे ,तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीसाठी बुधवारी दि,( 24) रोजी बाजार समिती कार्यालयात प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक डी.जी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष सभा घेण्यात आली. या विशेष सभेमध्ये सभापती पदासाठी सचिन पाटील यांचे नाव विजय गंगणे यांनी सुचवले त्याला अँड. दीपक आलुरे यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापती पदासाठी श्री संतोष बोबडे यांचे नाव सिद्धेश्वर कोरे यांनी सुचवले आशिष सोनटक्के यांनी अनुमोदन दिले .यामध्ये सभापती पदासाठी सचिन पाटील यांचा तर उपसभापती पदासाठी संतोष बोबडे यांचा एकमेव अर्ज आल्याने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी श्री सचिन पाटील यांची सभापतीपदी तर उपसभापती पदी श्री संतोष बोबडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रसाद कुलकर्णी, बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे, उमेश राठोड यांनी साहाय्य केले. सभापतीपदी सचिन पाटील यांची तर उपसभापती संतोष बोबडे यांची निवड यांची बिनविरोध निवड होताच भाजप स कार्यकर्त्यांनी भगव्या आरगजाची उधळण करीत फटाके फोडून मोठा आनंदोउत्सव साजरा केला. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटिल,व भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सदिच्छा भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नूतन सभापती पाटील व उपसभापती बोबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, विक्रम सिंह देशमुख,माजी सभापती विजय गंगणे, नागेश नाईक, विजय कंदले,चित्तरंजन सरडे,अँड दिपक आलुरे,प्रशांत लोमटे,सुहास गायकवाड, सोनल जाधव, ताराबाई पवार, विजयी शिंगाडे, बालाजी रोचकरी, संतोष कदम, दत्तात्रय वाघमारे, दिनेश बागल, राजाभाऊ सोनटक्के, नागेश चौगुले,अविनाश गंगणे,विशाल रोचकरी, सतीश दंडनाईक, बाबा घोंगते, गोविंद डोंगरे, सिद्धेश्वर कोरे, राजेश्वर कदम अमर हंगरगेकर, बाबा श्रीनामे, आदीसह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.
सभापती सचिन पाटील यांना दुसऱ्यांदा संधी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती सचिन पाटील यांनी या अगोदर सभापती पदावर काम केली होती, या पदावर काम करण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
0 Comments