Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वेगाडीत दिव्यांगाना मिळणार आता लोअर बर्थ |Disabled people will now get lower berth in the train


रेल्वेगाडीत दिव्यांगाना मिळणार आता लोअर बर्थ 



 नागपुर: रेल्वेगाडीत प्रवास करताना दिव्यांगाना अनेकदा लोअर बर्थ मिळत नाही त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. मात्र रेल्वे बोर्डाने प्रवासामध्ये होणारा त्रास रोखण्यासह त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने स्लीपर कोच मध्ये लोअर बर्थ आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वास्तविक सद्यस्थितीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यात प्रवाशाची संख्या गर्दी अधिक आहे. अशा स्थितीत दिव्यांगाना  जागा मिळत नसल्याने त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. ही बाब लक्षात घेत रेल्वे बोर्डाने दिव्यांग व शारीरिक दृष्ट्या असक्षम प्रवाशांसाठी लोअर  बर्थ आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयानुसार दिव्यांगासाठी स्लीपर क्लासमध्ये चार जागा राखीव राहणार असून त्यामध्ये दोन लोअर  आणि दोन मिडल बर्थ असतील.

वातानुकुलित  तृतीय सेनेमध्ये दोन तृतीय श्रेणीमध्ये इकॉनोमित दोन जागा राखीव राहणार आहेत. दिव्यांगासोबत प्रवास करणारी व्यक्ती ही या बर्थ वर बसून प्रवास करू शकतील, यासह गरीब रथ एक्सप्रेस मध्ये दोन लोअर आणि दोन अप्पर बर्थ दिव्यांगासाठी राखीव राहतील ,रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांगाना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments