नमो शेतकरी महासन्मान योजनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, राज्य शासनाकडून शेतकऱ्याला वार्षिक ६००० मिळणार
मुंबई: केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी, योजनेच्या धर्तीवर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने ' नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून केंद्राप्रमाणेच शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 6000 रुपये देणार आहेत,नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेला आज दि 30 रोजी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आली आहे, त्यामुळे राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्याला एकूण वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एकाच वेळी जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मे अखेरीस अथवा जुलै शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाचवेळी 4000 हजार रुपये जमा होणार आहेत.
0 Comments