लग्न समारंभातील फटाक्यांची आताषबाजी पडली महागात, फटाका अंगावर पडल्याने तीन जण गंभीर जखमी
गोंदीया: तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथे विवाह सोहळ्या दरम्यान वर पक्षाकडुन तरुणांनी मंगलाष्टके संपतात फटाके फोडण्यास सुरुवात केली मात्र फाटा का अंगावर पडल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दिनांक २ मी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
यामध्ये मनोहर तुमसरे (वय ५० रा.कुलपा ता.तिरोडा जि.सांगली) सुभाष खडोदे (वय ५० रा.नागपुर) व उमेश चाणोरे (वय ४५ सेलोटी जि.गोदिंया) असे गंभीर झालेल्यांची नावे आहेत.यापैकी मनोहर तुमसरे यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर स्वगावी उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथे राजकुमार सांगळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभात गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर येथील वर पक्षाकडून वराडी व विहीरगाव येथील वधू पक्षाकडील पाहुणे एकत्र जमले होते.
या विवाह सोहळ्याचे मंगलाष्टके संपताच वर पक्षाकडून तरुणांनी मंडपा बाहेर फटाक्यांची आताषबाजी करीत असताना फटाका अचानक बाहेर उपस्थित असलेल्या वराडी पाहुण्यांच्या अंगावर पडला या घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी झाली असून नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तुमसर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केली आहे या तिन्ही जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहित आहे.
0 Comments