Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग ते तुळजापूर पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनच्या वॉल्व्हमधून बेसुमार पाणीगळती| Innumerable water leakage from the valves of the pipeline supplying water from Naladurg to Tuljapur....

नळदुर्ग ते तुळजापूर पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनच्या वॉल्व्हमधून बेसुमार पाणीगळती .......         

 


तुळजापूर : तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरणातून तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरास तब्बल एकफूट व्यासाच्या भूमीगत पाईपमधून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनच्या वॉल्व्हला मानेवाडी पाटी ते हागलूर दरम्यान गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सदरची गळती अंदाजे दोन इंची पाईपमधून जेवढा पाणीपुरवठा होतो तेवढी चोवीस तास होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कित्येक गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र तुळजापूर नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुळजापूरवासीयांना हजारो लिटर पाण्यास मुकावे लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून संबंधीत वॉल्व्हची गळती बंद करून नाहक वाया जाणारे पाणी थांबवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments