वाशी: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
![]() |
धाराशिव : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना सोमवारी दिनांक 22 रोजी दुपारी घडली. प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की वाशी येथील नगरसेवक संतोष गायकवाड यांची मुलगी संजना गायकवाड वय (२२) ही छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती.मागील काही दिवसापु वाशी येथे आली होती.सोमवारी दुपारी घरातील सर्व लोक शेतात गेले होते.दरम्यान तीने राहत्या घरातील फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सांयकाळी पाच वाजेच्या वडील घरी आल्यानंतर ही दुर्घटना निदर्शनात आली. त्याची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन पठाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस काळे यांनी शवविच्छेदन केले.
0 Comments