चिवरी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न
चिवरी:तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे दि,१७ रोजी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलिततफ्रे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले , यामध्ये ६०१ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ, नवी मुंबई यांच्या विद्यमाने आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिवरी , ता.तुळजापुर येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन करण्यात होते.
या आरोग्य शिबीरात येथील सर्व वयोगटातील एकूण ६०१ नागरिक सहभागी झाले. यात प्रामुख्याने हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग,पोटाचे विकार,त्वचा रोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली तसेच रुग्णांना औषधांचा पुरवठाही करण्यात आला. यापैकी काही १५० रुग्णांना पुढील उपचारासाठी तेरणा हॉस्पिटल, नेरुळ, नवी मुंबई येथे शिफारस करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रशांत( पिंटू) बिराजदार उपसरपंच लक्ष्मण लबडे,संदीप शिंदे ,विठ्ठल होगाडे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार,युवा नेते सचिन भैया बिराजदार शिवराज भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील,अनिल देडे, कल्याण स्वामी, धनाजी कोरे ,अंगणवाडी सेवीका,आशा कार्यकत्या आदिसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments