Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे विविध विकास कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन|Statement to Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding various development works at Tuljapur

 तुळजापुर येथे विविध विकास कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 



तुळजापुर:  कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले असता आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिन रोचकरी व युवा नेते विनोद गंगणे यांच्या वतीने विविध विकासकामा संदर्भात निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने हुतात्मा चौक ते पावणारा गणपती रस्ता रुंदीकरण व भुसंपादन करावे ,तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी नवरात्र यात्रा अनुदानात वाढ करावी, नगरपरिषद मधील विविध महत्त्वपूर्ण कर्मचारी पदे भरण्यात यावी, नगरपरिषदेचे 2019 व 20 चे प्रलंबित यात्रा अनुदान तात्काळ मिळावे, अशा विविध विकास मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्याचबरोबर अनेक वर्षापासून रखडलेला सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गाला 450 कोटी निधी अर्थसंकल्पात मंजूर केल्याबद्दल मंदिर महाद्वार समोर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा रेल्वे संघर्ष समिती व समस्त तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला, यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी नगरसेवक व सहकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments