तुळजापूर ते सास्तुर बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
तुळजापुर: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्या हिप्परगा गावच्या राष्ट्रीय शाळेतून झाली , त्याच गावात सद्यस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना बस अभावी शाळेला जाता येत नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा रवा यांच्याकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगार प्रमुख यांच्याकडे तुळजापूर ते सास्तुर बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की हिप्परगा रवा येथील स्वामी रामानंद तीर्थ विदयालय, येथे वडगाव देव , बोरनदीवाडी येथून25 वर्षापासून 30 ते 35 विदयार्थी शाळेला येतात.सदर विद्यार्थ्याला सकाळी वडगाव देव येथे येण्यासाठी सास्तुर बस होती, व संध्याकाळी परत जाण्यासाठी ४.३० वाजता हिप्परगा रवा येथून बस होती. सद्यस्थितीमध्ये ही बस बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेला येऊ शकत नाहीत ,बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच बसने वडगाव देव व हिप्परगा रवा येथील अनेक विद्यार्थी सलगरा दिवटी व लोहारा येथील कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी जातात. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सास्तुर व तुळजापूर ही बस पूर्ववत करण्याची मागणी शाळेने निवेदनाद्वारे केली आहे
..
0 Comments