Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले व प्रमाणपत्र १५ जुलैपर्यंत,ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात यावेत : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले व प्रमाणपत्र १५ जुलैपर्यंत,ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात यावेत : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद,दि.30 -जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले व प्रमाणपत्र दि.15 जुलै 2023 रोजीपर्यंत ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात यावेत तसेच सदर दाखले व प्रमाणपत्र ऑफलाईन पध्दतीने निर्गत करण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केल्या आहेत.

                  सर्व्हर डाऊन असल्यामुळे तसेच तांत्रिक अडचणीमुळे चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध दाखले तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यास विलंब व अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले विविध दाखले व प्रमाणपत्र दि.15 जुलै 2023 रोजी पर्यंत ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्याबाबत आणि ऑफलाईन पध्दतीने निर्गमित करण्याबाबत अपर मुख्य सचिव, महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांनी सूचित केले आहे.

Post a Comment

0 Comments