ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची ४ जुलैपासून प्रथमस्तरीय तपासणी सुरु होणार : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद,दि,१ - भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हयात दि. 04 जुलै, 2023 पासून ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची प्रथम स्तरीय तपासणी सुरु (First Level Checking ) करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 करीता BEL बेंगलोर या उत्पादक कंपनी यांच्याकडून M3 (EVM-WPAT) - BU-3532, CU-1872 VVPAT - 2354 मशीन्स प्राप्त झालेल्या आहेत.
सदरील BEL बेंगलोर या उत्पादक कंपनी यांच्याकडून M3 (EVM-WPAT) मशीन्सची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking ) दि.04 जुलै 2023 पासून सुरु करण्यात येणार असल्याने या कामकाजाकरिता निवडणूक आयोगाकडून भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे (BEL बेंगलूर ) 08 अभियंते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.04 जुलै, 2023 पासून ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking ) ही उस्मानाबाद तालुक्यातील मौजे पिंपरी येथील शासकीय EVM-WPAT गोदामात होणार आहे. या कामासाठी आवश्यक अधिकारी, मास्टर ट्रेनर, मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज 01 महिना चालू राहील. ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय तपासणीचे कामकाज सकाळी 09.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात होणार आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत पक्षांच्या राजकीय प्रमुखांनी, प्रतिनिधी यांनी ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची प्रथम स्तरीय तपासणीवेळी उपस्थित राहून EVM-WPAT मशीन विषयी माहिती जाणून घ्यावी. काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्याचे निराकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते यांच्याकडून करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
0 Comments