Hot Posts

6/recent/ticker-posts

उस्मानाबाद जि.प.मध्ये जागतिक योग दिन साजरा

उस्मानाबाद जि.प.मध्ये जागतिक योग दिन साजरा.


 प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


उस्मानाबाद,दि.23 :- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आयुष विभागाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थायराईड वृध्दी, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, औषधोपचारासोबत योग व प्राणायाम करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यामध्ये मदत होते. तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी दिली. सन 2023 करिता “हर घर योग, हर अंगण योग” ही संकल्पना ठेवण्यात आली आहे.


आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन सामुदायिक स्वरुपात जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे दि. 21 जून रोजी रोजी सकाळी 7.00 ते 7.45 वा. या वेळेत Comman Yoga Protocal नुसार सामाजिक अंतर व कोविड-19 चे नियम पाळून प्रात्यक्षिक करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर तसेच जि.प. व राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद येथील सर्व स्त्री व पुरुष कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.गजानन परळीकर यांनी योगाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच योग प्रात्यक्षिक देखील यांनी करुन दाखवले.


तसेच जिल्हा रुग्णालय येथील साप्ताहिक योग सत्र जिल्हा परिचर्या कॉलेजमध्ये 2015 पासून घेतला जात आहे. स्वस्थ व्यक्ती व स्टाफ तसेच रुग्णांना योगासने बाबत सल्ला दिला जातो. तसेच माहे जून 2022 पासून साप्ताहिक योग सत्र स्त्री रुग्णालयांमध्ये चालू केला आहे. यामध्ये गरोदरमाता, स्तनदामाता व बालक यांना योगासन आणि प्राणायाम बाबत सल्ला वैद्यकीय अधिकारी मार्फत दिला जातो. जिल्हा रुग्णालयामध्ये आयुष विभागामार्फत रुग्णांना व्याधी नुसार योगासन व प्राणायाम बाबत सल्ला 2008 पासून दिला जात आहे, असे जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments