रत्नत्रयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
नातेपुते/प्रतिनिधी :- 21 जून रोजी आपण जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला ‘योग’ ही एक अनमोल देणगी दिलेली आहे. प्रत्येक वर्षी रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे मध्ये जागतिक योग दिन साजरा केेला जातो.पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली.
सदर प्रसंगी बोलताना रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी म्हणाले "2023 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्र संघ कमिशनने ‘Yoga for Vasudhaiva Kutumbkam’ असे नाव दिले आहे. आजच्या या पावन दिनी आपण स्वतःशी संकल्प करूया की आपल्या आयुष्यात नियमित योग करून आपले आरोग्य सुधारुया आणि योगाचे महत्त्व इतरांनाही पटवून देऊ. पुन्हा एकदा आपण सर्वांना माझ्याकडून जागतिक योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा करणे हे खूप महत्त्वाचे आहे."
या वेळी संस्थापक श्री अनंतलाल दोशी, चेअरमन श्री प्रमोद दोशी, रामदास कर्णे,सुरेश धाईंजे,बबन गोफने, ज्ञानेश राऊत, अमित पाटील सर, दैवत वाघमोडे सर, पालक सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments