स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव ,दि.21 :- धाराशिव भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बुधवार दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 07:30 ते 08:15 या वेळेत जागतिक योग दिन अतिशय उत्साहात संपन्न झला.
धाराशिव भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय सभागृहात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास योग गुरु डॉ.महादेव पाटील यांनी योगाची सुरुवात प्रार्थनेने केली. शेतूबंधासन, कपालभाटी, ताडासन, भुंजगासन, प्राणायम, पवन मुक्तासन, दंड बैठक स्थितीतील आसनाचे प्रकार, भद्रासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, मक्रासन, अनूलोम-विलोम प्राणायम,भ्रामरी,भस्त्रीका प्रात्यक्षिकासह घेतले आणि शेवटी शांती पाठ घेवून समारोप करण्यात आला.
उपस्थित सर्वांचे आभार जिल्हा संघटक (स्काऊट) विक्रांत अनंत देशपांडे यांनी मानले. या योग शिबिरामध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील 10 स्काऊट, 10 गाईड तसेच गाईड कॅप्टन श्रीमती आर्शिया जहागीरदार उपस्थित होत्या.
0 Comments