Hot Posts

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षेची गरज ओळखून नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षेची गरज ओळखून नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन


नातेपुते ( प्रतिनिधी ) : स्पर्धा परीक्षांचे आज फार महत्त्व वाढले आहे आणि त्यामुळेच स्पर्धा परीक्षेचे तंत्र जे प्राप्त करतील अशा विद्यार्थ्यांना आपले करीअर उत्कृष्ट करून जीवनमान उंचावता येणार आहे. बऱ्याचदा पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सरकारी नोकरी मिळते कशी? त्यासाठी पात्रता कोणती असते? अर्ज कोठे मिळतात? नोकरी मिळण्यासाठी वेगळा कोर्स करावा लागतो का? परीक्षा असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम कोणता असतो? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उमेदीच्या काळात सतावतात राहतात. 

 परीक्षेसाठी आपली स्वत:ची भूमिका फार महत्त्वाची आहे. या परीक्षेसाठी ध्येय, चिकाटी, मेहनत, नियोजन व सहनशीलता वेळेचे व्यवस्थापन आत्मविश्वास व कल्पनाशक्ती या गुणांबरोबरच सकारात्मक भूमिका ही महत्त्वाची असल्याचे मत प्रमुख व्याख्याते भैय्यासाहेब भागवत यांनी व्यक्त केले.

    ते नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल सीबीएससी स्कूलमध्ये इ.५ वी पासुन पुढील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात.  आलेल्या स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन पर बोलत होते. यावेळी प्रमुख व्याख्याते भैय्यासाहेब भागवत, तसेच प्राचार्य संदिप पानसरे, स्कूल मॅनेजर शकूर पटेल, स्पर्धा परिक्षा प्रमुख हरिदास गोरवे, सारिका पानसरे, सारीका पालवे, आसिफ शेख, उपस्थित होते. प्राचार्य संदीप पानसरे बोलत असताना म्हणाले की, 

ग्रामीण भागातून शासकीय अधिकारी झाल्याचे जास्त प्रमाण आहे नातेपुते व पंचक्रोशीतील गोरगरिबांच्या मुलांना अधिकारी म्हणून शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते येथे एस एन डी करिअर अकॅडमीची स्थापना करून संस्थेचे चेअरमन मालोजीराजे देशमुख व संचालक मंडळ यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या दिल्या असल्याचे मत संदीप पानसरे यांनी व्यक्त केले यांनी केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास गोरवे यांनी केले असून आभार सारिका पानसरे यांनी मानले आसिफ शेख, सारिका पालवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Post a Comment

0 Comments