Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे सुर्वे प्रतिष्ठान तर्फे कन्या शाळेत वह्या वाटप

नातेपुते येथे सुर्वे प्रतिष्ठान तर्फे कन्या शाळेत वह्या वाटप


नातेपुते/ विलास भोसले प्रतिनिधी : दि.३० जून रोजी कन्याशाळा नातेपुते येथे  अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान नातेपुते यांचे कडून कन्याशाळा, केंद्रशाळा, पालखी मैदान, पांढरेवस्ती,बरडकरवस्ती, बोराटेवस्ती या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान चे अध्यक्ष विनायक भैय्या सुर्वे, उपाध्यक्ष  अर्जुनराव पिसाळ सचिव जगदीश देशपांडे, सदस्य सागर साळुंखे, नगरसेवक बी.वाय.राऊत वकील साहेब, देविदास भैय्या चांगण,मंगेश दीक्षित,सौ.वैशाली दीक्षित, नातेपुते केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत सरूडकर, विनायक भैय्या सुर्वे मित्र परिवार, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अंकुश भाऊ सुर्वे यांनी कन्याशाळा व केंद्रशाळा या दोन शाळा, प्रतिष्ठान तर्फे दत्तक घेतल्या आहेत.या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.

वह्या वाटप १ला टप्पा पूर्ण केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले


Post a Comment

0 Comments