Hot Posts

6/recent/ticker-posts

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता 

उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) - एका विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी पतीसह सासरच्या मंडळींच्या विरोधात विवाहितेस जाच करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयात खटला दाखल होता. मात्र ३ रे सत्र न्यायाधीशांनी सर्व आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या सासऱ्याच्या जाचास व सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून केल्याची तक्रार दिल्यामुळे या प्रकरणात नवरा व सासू-सासरे यांच्या विरोधात विवाहित महिलेस आत्महत्या करण्यास  प्रवृत्त केल्याचा गुन्हा उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.  २८/२०१४ कलम ४९८ ए, ३०६, ३४ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी उस्मानाबाद येथील ३ रे सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात होऊन विविध मुद्द्यांवरील युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने बादल बबन गायकवाड, बबन येडबा गायकवाड व कलावती बबन गायकवाड या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

 या प्रकरणी ॲड. अमोल वरुडकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. बी. डी. जोमदे-कदम, ॲड. वैभव खांडेकर, ॲड. संजय आर. व्हटकर, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. रोहित सोनवणे. ॲड. जनक साळुंके यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments