मॅग्नेट प्रकल्पांतर्गत अनुदानासाठी अर्ज करावेत - महादेव बरडे
उस्मानाबाद,दि,13 :- महाराष्ट्र अॅग्री बिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पामध्ये समाविष्ट असणा-या केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी, लाल), फुलपिके, आंबा, लिंबु, काजु व पडवळ या पिकांसंबंधीत काढणी पश्चात व्यवस्थापन व मुल्यसाखळी विकास आदीबाबतच्या उपप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा याअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स असोशिएसन्स) आणि मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्था बरोबर सक्रियपणे कामकाज करीत असलेल्या संस्था कि जसे अॅग्रीगेटर, प्रक्रियादार , निर्यातदार , मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था , कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे.
सदरील जाहिरात हि उपरोक्त नमुदप्रमाणे शेतकरी उत्पादक संस्था व मुल्यसाखळी गुंतवणुकदार या लाभार्थ्यांसाठी राहणार असून पात्र अर्जांचे मुल्यांकन करून मुल्यांकन निकषानुसार पहिल्या 70 लाभार्थ्यांची (56 शेतकरी उत्पादक संस्था व 14 मुल्यसाखळी गुंतवणुकदार) निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 पर्यंत अर्थसहाय्य देय राहील. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष, कागदपत्रांची चेकलिस्ट इ. बाबतची माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या (मराकृपमं) www.insamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची चेकलिस्ट डाऊनलोड करावयाची आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्पाच्या संबंधित प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पीआययु) तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे विभागीय कार्यालय लातूर येथे छापील प्रतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राहील.
अधिक माहीतीसाठी गजेंद्र नवघरे विभागीय प्रकल्प सहाय्यक, मॅग्नेट,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प, लातूर, मो. क्र. 9766302143 श्री. गणेश पाटील, विभागीय प्रकल्प व्यवस्थापक, मॅग्नेट, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प, लातूर, मो. क्र. 9518768712 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी केले आहे.
0 Comments