वर्ग दोनच्या जमीनी वर्ग एकमध्ये घ्याव्या, रस्ते कामाची स्थगिती उठवावी, क्रिडा संकुलाच्या विकासाबाबत आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.
धाराशिव ता. २५:वर्ग दोनच्या जमीनी वर्ग एकमध्ये घ्याव्या, रस्ते कामाची स्थगिती उठवावी, क्रिडा संकुलाच्या विकासाबाबत आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. धाराशिव शहरासह जिल्ह्यात महसुल विभागाने दोन वर्षापुर्वी वर्ग एकमध्ये असलेल्या इनामी जमीनी वर्ग दोनमध्ये करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे.
याबाबत जनआंदोलन देखील झाले तेव्हा महसुल मंत्री यांनी या जमीनी पुर्ववत वर्ग दोनमध्ये होतील असे आश्वासन दिले होते, मात्र अजुनही त्याबाबत काहीच हालचाल होत नसल्याने आमदार कैलास पाटील यानी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. ४० वर्षापुर्वी नजराना भरुन या जमीनी वर्ग एकमध्ये घेतल्या असुन आता पुन्हा त्या मिळकतदारावर अशाप्रकारचा अन्याय झाल्याची भावना त्यानी व्यक्त केली. विदर्भात ज्याप्रकारे कायदा करुन वर्ग दोनच्या जमीनी एकमध्ये हस्तांतरीत केल्या आहेत. त्या प्रमाणे धाराशिव जिल्ह्यात देखील करावे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच धाराशिव व कळंब तालुक्यातील रस्त्याच्या कामांना स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठवुन ही कामे होण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी बांधकाम मंत्री यांच्याकडे केली. कळंब येथील क्रिडासंकुलाचा वाढीव निधीचा प्रस्ताव मंजुर करावा तर धाराशिव तालुका क्रिडासंकुलासाठी एमआयडीसी कडुन जागा दिली आहे. मात्र एनएमसीने त्याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी अशा मागण्या त्यानी क्रिडामंत्री यांच्याकडे केल्या आहेत.
0 Comments