Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचारी, शिक्षकांच्या पगारी वेळेवर होईना !

जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचारी, शिक्षकांच्या पगारी वेळेवर होईना !


प्रतिनिधी रुपेश डोलारे  धाराशिव


धाराशिव- जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचारी व शिक्षकांच्या पगारी वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालून आश्रम शाळेतील कर्मचारी, शिक्षकांच्या पगारी दरमहा १० तारखेपर्यंत कराव्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा आश्रम शाळा कर्मचारी प्रतिनिधी सतीश कुंभार यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जिल्हयातील आश्रम शाळेतील कर्मचारी व शिक्षकांच्या पगारी वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेष करून  पतसंस्था, गृह कर्ज, पाल्यांचा शैक्षणिक खर्च, दवाखान्याचा खर्च, वाढती महागाई यामुळे दुर्गम भागात तांड्यावर शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा दहा तारखेला होणे, अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बजेटची तरतूद करून शिक्षकांचा पगार नियमित करावा. अन्यथा आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर आश्रम शाळा कर्मचारी प्रतिनिधी कुंभार यांची स्वाक्षरी आहेे.

Post a Comment

0 Comments